Sunday, 16 March 2014

महाभारत..द्रौपदीच्या दृष्टिकोनातून…

¸fWXf·ffSX°f..ýiü´fQe¨¹ff QÈd¿MXIYû³ff°fc³f...



¦fZ»¹ff ¸fdWX³¹ff·fSXf°f °fe³f ÀÂfe ´ffÂf IZÔYdýi°f ´fbÀ°fIaY ½ff¨f³ff°f Af»fe. '¸fe ½f³f½ffÀfe',
'¸fWXfV½fZ°ff' Afd¯f ³fbIY°fa¨f ´fg»fZÀf AfgRY B»¹fbªf³Àf ½ff¨fc³f ´fc¯fÊ IZY»fa. Àf°f°f d½fdVf¿MX ´fiIYfSX¨fa ½ff¨f³f IYSX°f SXfdWX»fa IYe Af´fûAf´f¨f Af´f»¹ff d½f¨ffSXÀfSX¯fe½fSX °¹ff¨ff ´fi·ff½f ´fOXc »ff¦f°fû. Af°ff ±fûOXf ¶fiZIY ¸W¯fc³f ½f´fba¨fa ¨f°fb·fÊbªf Wf°ff°f §fZ°f»fa¹f. »f½fIYSX¨f 'WXb¸ff³f'IYOZX ½fTf¹f¨fa¹f. ´f¯f ¹ff d°f³WXe ´fbÀ°fIYfa¸f²f»¹ff ³ffd¹fIYf IYfWXe ¸f³ff°fc³f ªff°f ³ffWXe°f. ´f`IYe ´fg»fZÀf AfgRY B»¹fbªf³Àf¨ff ´fi·ff½f ªffÀ°f AfWZX IYfSX¯f °fZ ³fbIY°fa¨f ½ff¨f»fa¹f.
A³fZIY dQ½fÀffa´ffÀfc³f WZX ´fbÀ°fIY ½ff¨f¯¹ff¨fe ´fi¨faOX CX°ÀfbIY°ff WXû°fe IYfSX¯f ¸fWXf·ffSX°f »fWXf³f´f¯ff´ffÀfc³f ¸ffWXe°f AÀf»fa °fSXe °¹ff°f»fa ´fi°¹fZIY ´ffÂf EIY ½fZ¦fTe IYWXf¯fe AfWZX AÀfa ¸f»ff Jc´f Af²fe´ffÀfc³f ½ffMX°f Wû°fa. ªf¦ff¨¹ff ´ffNXe½fSX QbÀf-¹ff QZVff°f Af¯fJe IbY¯fe°fSXe AÀff¨f d½f¨ffSX IYSX°f WXû°fa. d¨fÂff ¶fg³fªfeÊ dQ½ffIY÷Y³fe, A¦fQe ´fif¸ffd¯fIY´f¯fZ Àffa¦ff¹f¨fa °fSX WZX ³ff½f ¸fe ¹ffAf²fe IY²feWXe EmIY»fZ»fa ³f½WX°fa. dQ d¸fÀMÑZXÀf AfgRY À´ffBÊÀfZÀf ¹ff ´fbÀ°fIYf¶fïX»f EmIY»fa WXû°fa ´f¯f »fZdJIZY¶fïX»f IY²fe¨f ³ffWXe. AJZSXeÀf d°f¨fe-¸ffÓfe ·fZMX Óff»fe¨f. °fe ýiü´fQe¨¹ff ÷Y´ff°f ¸f»ff ·fZMX»fe ´fg»fZÀf AfgRY B»¹fbªf³Àf ¸f²¹fZ...
¸fWXf·ffSX°f Afd¯f °¹ff°f»fe ´ffÂf ýiü´fQe¨¹ff QÈd¿MXIYû³ff°fc³f ´ffWX¯¹ff¨fe Afd¯f Àf¸fªf¯¹ff¨fe ´fidIiY¹ff WZX ´fbÀ°fIY ½ff¨f°f AÀf°ff³ff Ad°fVf¹f ¶fZ¸ff»fc¸f´f¯fZ §fOX°f ªff°fZ. Qb¿MX²fb¸³ff¨ff WXf°f ²føY³f A¦³fe°fc³f AQзfb°f ªf³¸f §fZ°f»fZ»¹ff ýiü´fQe¨fa Af¹fb¿¹f ´fbPZX ª¹ff ª¹ff ½ffMXfa½f÷Y³f ´fi½ffÀf IYSX°fa °¹ff Àf½fÊ ½ffMXf ÀÂfe ¸WX¯fc³f IY²fe°fSXe ´fi°¹fZIYe¨¹ff ªfe½f³f ¸ff¦ffʨff ·ff¦f AÀf»¹ffÀffSX£¹ff ½ffMX°ff°f. ´f¯f ¸WX¯fc³f d°f¨fa ªfe½f³f Àf½fÊÀff²ffSX¯f WXû°fa AÀfaWe ¸WX¯f°ff ¹fZ¯ffSX ³ffWXe.    
¸fûNëfa¨fe ¸fªfeÊ SXfJ¯¹ffÀffNXe d°f³fZ IZY»fZ»¹ff °fOXªfûOXe, Af½fOX°¹ff ½¹f¢°fe¶fïX»f¨fa ´fiZ¸f ´fif¯f ÀfûOZX´f¹f˰fX ¸f³ff°f QOX½fc³f NZX½f¯¹ffÀffNXe¨fe d°f¨fe ²fOX´fOX, Ad³f¨LZX³fZ ´fQSXf°f ´fOX»fZ»fZ ´ff¨f ´f°fe Afd¯f °fZWe Àff²fZÀfb²fZ ³ffWXe°f °fSX ¹fbðXIY»ff Afd¯f B°fSX A³fZIY d½fôfa¸f²¹fZ ´ffSa¦f°f, JbïX QZ½ffa´ffÀfc³f ªf³¸f»fZ»fe Afd¯f AJaOX ·ffSX°f½f¿ffʰfe»f Àf½ffʰf ¶f»ffPë Àff¸fifª¹f AÀf»fZ»¹ff WXdÀ°f³ff´fcSX¨¹ff ¦ffQe¨fZ ½ffSXÀfQfSX - ´f¯f B°fIaY AÀfc³fWXe Af¹fb¿¹ff¨ff EIY ¸fûNXf IYf»fJaOX ½f³f½ffÀff°f IYfPX¯¹ff¨fe d°f¨¹ff½fSX Af»fZ»fe ½fZT, °¹ffÀffNXe ¸ff³fdÀfIY °f¹ffSXe IYSX°ff³ff d°f¨¹ff ¸f³ff¨fe Óff»fZ»fe §ff»f¸fZ»f, AdõX°fe¹f,AQзfb°f AÀff ¸fWXf»f »ff·f»¹ff³fa°fSX WX¿fûg³¸fd»f°f Óff»fZ»fe d°f¨fe ÀÂfe°ff, IÈY¿¯ffÀffSXJf Q`½fe ´fif¯fÀfJf »ff·fc³fWXe °¹ff¨fe dQ½¹f°ff IY²feWXe ³f AûTJc VfIY¯ffSXe d°f¨fe d³fSXf¦fÀf°ff, ·fSX Àf·fZ°f A´f¸ffd³f°f Óff»¹ff³fa°fSX d°f¨¹ff ¸f³ff°fc³f ¶ffWZXSX ´fOX»fZ»¹ff IiYû²ff¨fe Afd¯f ¸fbJf°fc³f ¶ffWZXSX ´fOX»fZ»¹ff Vff´ff¨fe QfWXIY°ff, IbY÷YÃfZÂff½fSX¨¹ff ·fe¿f¯f WXf³fe³fa°fSX ¦f»f¶f»fZ»fe d°f¨fe Àfa½fZQ³fVfe»f°ff AÀfa ¶fSaX¨f IYfWXe ýiü´fQe¨¹ff ½¹fd¢°f¸fؽff¨fZ EIY-EIY ´fQSX CX»f¦fOX°f Af´f¯f ¹ff ´fbÀ°fIYf°fc³f A³fb·f½f°f SXfWX°fû, °fe ½ff¨fIYf»ff Àf¸fªf°f ªff°fZZ, Ad²fIY ªf½fT¨fe ½ffMXc »ff¦f°fZ.
IY²fe °fe EJfôf Àff¸ff³¹f ÀÂfe ÀffSXJe ÀffÀfc IbaY°fe¨ff QbÀ½ffÀf IYSX°fZ °fSX IY²fe ÀfbSXdÃf°f Af¹fb¿¹ff¨ff °¹ff¦f IYøY³f Afd¯f ´fûMX¨¹ff ¸fb»ffa³ff Àf½f°feÔ¨¹ff WXf°fe Àfû´f½fc³f ´f°³fe²f¸fÊ ´ffT¯¹ffÀffNXe ´f°feaÀfû¶f°f rs ½f¿ffÊa¨ff ½f³f½ffÀf Afd¯f EIY ½f¿ffʨ¹ff AÄff°f½ffÀff¨ff ¸ff¦fÊ ´f°IYSX¯¹ff¨fZ AÀff¸ff³¹f°½f QfJ½f°fZ.
d°f¨¹ff ªf³¸ff´ffÀfc³f ¸fȰ¹fb´f¹f˰f d°f¨fa ªfe½f³f, d°f¨¹ff ·ff½f³ff, d°f¨fa ´fiZ¸f, ¸f`Âfe, ÀfbJ-Qb:J, ½fZQ³ff, A½fWZX»f³ff, IiYû²f, ¸f°ÀfSX, ·fe°fe, AÀfa Àf¦fTa Àf¦fTa Af´f¯f A¦fQe ªf½fTc³f A³fb·f½f°fû. ´f¯f °fSXeWXe EIYf Ãf¯ffÀffNXeQZJe»f d°f¨ff WZX½ff ½ffMX°f ³ffWXe, Af´f¯f AÀfZ AÀff¹f»ff WX½fa AÀfa ½ffMX°f ³ffWXe, IY²fe ÀfWXf³fb·fc°fe °fSX IY²fe ¸f°f·fZQ WXû°fû ´f¯f d°f¨¹ff°f Àf¸fSXÀfc³f ªff½faÀfa ½ffM°f ³ffWXe. Af´f¯f d°f-WXfBʰf´f¯fZ §fOX¯ff-¹ff §fMX³ffa¨fZ RY¢°f ÀffÃfeQfSX AÀf°fû Afd¯f B±fZ¨f ¸ffÓ¹ff¸f°fZ »fZdJIZY¨fa ¹fVf AfWZX.

तृप्ती एकबोटे-देवरुखकर


Thursday, 13 February 2014

संसार दोघींचा

संसार दोघींचा

एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, असं म्हणतात. मात्र समई लावताना दोन वाती एकत्रच जाळाव्या लागतात. सासू-सुनेमधल्या पारंपरिक वादात मला शिरायचं नाही. कारण त्याविषयी आधी ब-याच जणांनी लिहून-बोलून झालंय. सासू-सून हे नातं केवळ भांडण्यासाठी आहे असा समज काहींनी जणू स्वत:च्या मनोरंजनासाठीच सर्वत्र पसरवून ठेवलाय. वास्तवात या अनोख्या नात्याचे अनेक पैलू आहेत. त्यांचे स्वतंत्र विचार आहेत आणि समस्याही आहेत. या नात्याला आता एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे.

मायले माय म्हणता ओठांले ओठ भिडे।
चुलतीले काकी म्हणता अंतर किती पडे॥
जिजीला जिजी म्हणता झाला जिभेला निवारा।
सासूला सासू म्हणता गेला तोंडातून वारा॥
बहिणाबाईंच्या या ओळींचं वर्णन करताना सिंधुताई सपकाळ त्यांच्या आत्मचरित्रात ‘मी वनवासी’मध्ये लिहितात की, सासू-सुनांच्या नात्यामधला विस्तव हा आपल्या संस्कृतीला लागलेला शाप आहे का? याचं उत्तर वरच्या ओळींमधून बहिणाबाईंनी शोधलं आहे. पण प्रत्यक्षात मला मात्र वाटतं की, या अनोख्या नात्याच्या गुंत्याची उकल खुद्द परमेश्वराकडेही नसेल. हे नातं आहेच इतकं मजेशीर! सासू नसणा-यांना कदाचित सासूची किंमत कधीच कळणार नाही आणि सून नसणा-यांना तिच्या असण्यातली गंमत कधी लक्षात येणार नाही. खरंच, सासू-सुनेचं नातं जगावेगळंच असतं. सुरुवातीला कच्च्या कैरी इतकं आंबट असलं तरी काळाच्या मधुर पाकात मुरत जाऊन चविष्ट मोरंब्या इतकंच ते हवंहवंसं होतं. सासू-सून अशा द्विपात्री बहुअंकी नाटकाचा प्रेक्षक म्हणून आस्वाद घेणं मनोरंजक आहे, पण स्वत:वर जेव्हा त्यातली एक कुठलीही भूमिका पेलण्याची वेळ येते तेव्हा खरी कसोटी लागते. खरं तर दोन्ही भूमिका पेलण्याची वेळ जवळपास प्रत्येक स्त्रीवर येतेच, पण त्यातही सासूच्या भूमिकेचे दोन पैलू असतात म्हणजे; ‘ती’ची सासू आणि ‘त्या’ची सासू असे! पैकी सामान्यत: त्याची सासू अत्यंत हळवी, भित्री आणि सतत जावयाला संतुष्ट ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारी असते, तर तिची सासू निर्धारी, काहीशी अहंकारी आणि सुनेला सतत पाण्यात पाहणारी असते, असा सर्वमान्य समज आहे. पण हा काही नियम नाही. मग सासू किंवा सून बनताना मन पूर्वग्रहदूषित करून आपली भूमिका ठरवून टाकण्यापेक्षा आधी एकमेकींना थोडा वेळ देऊन, पारखून मग आपल्या वागण्याचा रोख ठरवायला काय हरकत आहे?
मी सासू आहे म्हणून दुष्टच वागलं पाहिजे आणि मी सून आहे म्हणून खाष्टच वागायला हवं असं काही कुठे लिहिलेलं नाही. हो, स्त्रियांच्या आयुष्यातील विभाज्य घटक असलेल्या टीव्हीवरच्या दैनंदिन मालिकांनी मात्र स्वत:चं मीटर धावतं ठेवण्यासाठी हा नियम आपल्यावर जणू लादूनच टाकलाय.
पूर्वीच्या काळी नकळत्या कोवळ्या वयात मुलींची लग्नं व्हायची. भातुकलीच्या खेळात रमलेल्या त्या लेकींना घर-संसाराच्या रहाटगाडय़ाची कल्पनाही नसायची. अशा वेळी घरातली सारी कामं, पाहुण्यांची उठबस, बाजारहाट, धुणी-भांडी असं बरंच काही या नवविवाहितांना शिकवण्याची, समजावण्याची जबाबदारी अर्थात सासूबाईंवर पडायची. मुलाचं चुकलं तर जसा मातेच्या कपाळी दोष जातो तसा सुनेचं चुकलं तरी दोष सासूलाच असे, मग सासू आपल्यावरचा दोष सुनेच्या माहेरावर लादून मोकळी होत असे. आपल्या लहान लेकरांना जितक्या सहजपणे रागावून, ओरडून एखादी गोष्ट आई समजावत असते, तशीच पण काहीशा अधिक कठोरतेने ती सुनेला समजावली जायची. त्यात मायासुद्धा असायचीच, कारण त्यामुळेच कालांतराने सुनेने सासूला ‘सासूबाई’ न म्हणता ‘आई’ म्हणण्याची किंवा घरातली मुलं ज्या नावाने हाक मारतात त्या नावाने (मम्मी, मम्मा, माई, आक्का) हाक मारण्याची पद्धत रुजली असावी.
मला कायम या एका नात्याविषयी प्रचंड कुतूहल वाटत असायचं. अनेकींच्या अनेक कथा-कहाण्या ऐकत,अनुभवत मीही मनाची तयारी करत होते. माझ्या नव-याने पहिल्याच भेटीत मला एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगितली होती, काहीही झालं तरी आई-बाबांना सोडून वेगळं राहण्याचा विषय कधीही काढायचा नाही. मी त्यावर संमतीदर्शक मान डोलावली खरी, पण पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा मला तेव्हा अंदाज नव्हता. सुदैवाने माझे सासू-सासरे आणि घरातली इतर माणसंही अगदी थोडय़ाच कालावधीत माझ्या जिव्हाळ्याची झाली आणि त्यांच्याशिवाय वेगळं राहण्याची कल्पनाही मनाला कधी शिवेल असं वाटत नाही. तशी वेळ कधी येऊही नये असं मनापासून वाटतं.
काही दिवसांपूर्वी ब-याच अवधीनंतर एक मैत्रीण ऑनलाइन भेटली. तिच्या लग्नाला आता जवळजवळ चार वर्ष उलटून गेली असतील. एक मूलही झालंय. माझी चौकशी करताना एकदम भावुक झाली आणि म्हणू लागली, ‘‘सासूसोबत राहणारेस? म्हणजे संसार सुखाचा अनुभव काही तुला मिळायचा नाही.’’ मी एकदम दचकले. म्हटलं ‘‘असं का म्हणतेस? अगं, माझा नवीन संसार आहे.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘तुझा कुठे तो तर तुझ्या सासूबाईंचा संसार आहे.’’ पुढे स्वत:चे अनुभव सांगताना ती म्हणाली, ‘‘आमच्याकडे बघ, लग्नाला चार वर्ष होऊन गेली, पण घरातला एकही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला नाही. अगदी कोणती भाजी करायची हेही नाही. स्वयंपाकघरातला माझा वावरही अगदी नावापुरताच असतो, कारण ते स्वयंपाकघर माझंसुद्धा आहे, असं मला कधी कुणी जाणवूच दिलं नाही. माझ्या आईने आवडीने मला रुखवतात दिलेल्या सगळ्या संसारोपयोगी वस्तू तशाच माळ्यावर पडून आहेत. असं वाटतं माझा स्वत:चा संसार असता तर किती हौसेने केलं असतं मी सगळं..’’ आणि पुढे बराच वेळ तिचं आपलं हे पुराण सुरू होतं. या संभाषणानंतर मी एकदम अंतर्मुख झाले.
खरं तर, यात पूर्णपणे सासूचा दोष नाही. काडी-काडी करून जमवलेला संसार अचानक एक दिवस नव्या स्त्रीच्या स्वाधीन करण्याचा मोठेपणा कुठल्याही स्त्रीच्या ठिकाणी असणं फार दुर्मीळ आहे. मग अशा वेळी सुनेनंच पुढाकार घेऊन, प्रसंगी संघर्ष करून आपला हक्क घरात प्रस्थापित करायला हवा. ज्या सासवांना सुनेला घरातला हक्क मुळी द्यायचाच नसेल त्यांनी निदान तिच्या संसार मार्गावर अडथळा तरी बनू नये, असं माझं प्रामाणिक मत आहे. माझ्या परिचयात अशी अनेक कुटुंब आहेत, ज्यांनी लग्नाआधीच मुलाच्या स्वतंत्र संसाराची सोय करून ठेवली होती. नाहीतर घरातल्या अतिसुरक्षित वातावरणात वाढल्याने चार टक्के-टोणपे खाऊन संसार करण्याची अक्कल कुठून यायची. फक्त मुलगा जवळ राहावा म्हणून नाइलाजाने सुनेला घरात सहन करणारी कुटुंबंही मी पाहिली आहेत, पण यात तिच्या असुरक्षित मनाची आणि संसारस्वप्नांची राखरांगोळीच होत असते आणि घरातलं वातावरणही कायम दूषित होत असतं. मनाने दूर राहून एका छताखाली राहण्यापेक्षा दूर राहून मनाने जवळ राहणंच शहाणपणाचं नाही का?
याउलट सासूवर वरचढ होऊन बसणा-या अनेक सुनाही आहेतच. नवीन घरात आल्या आल्या घराचं रूप पालटून टाकण्याच्या अट्टहासाला पेटून अगदी झपाझप घरातली सगळी सत्ता काबीज करू पाहणा-या सुनांचीही काही कमी नाही.
असं असलं तरी सासू-सुना वर्षानुवर्ष सुखा-समाधानाने एकत्र संसार करत असलेलीही अनेक कुटुंबं मी अगदी जवळून पहिली आहेत. गरज असते ती थोडं मोकळं होण्याची! माझं माझं करत एखाद्या गोष्टीला चिकटून राहण्यापेक्षा ‘आपलं’ म्हणून ती वाटून घेतली की प्रश्न आपोआप सुटतात. थोडीफार कुरबुर व्हायचीच. माहेरी असताना नाही का आपले आई-वडिलांसोबत मतभेद होत?
एकत्र राहायचंय अथवा नाही याचा एकदा निर्णय घेऊन मोकळं झालं तर ब-याच गोष्टी सुटसुटीत होतात. आमचं एकत्र राहायचं आधीच ठरलंय, त्यामुळे सध्या मी आणि माझ्या सासूबाई, अशी आम्हा दोघींची एकमेकींना समजावून घेण्याची जणू कार्यशाळाच सुरू आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्याचं मी खोल विश्लेषण मनातल्या मनात करत असते. त्या तसं करत नसतील कदाचित! कारण त्यांचा तो स्वभावच नाही. मी मात्र कुठल्याही छोटय़ा गोष्टीच्या वाक्याच्या खोलात शिरून, त्याचा मागमूस काढून मोकळी झालेली असते. त्या मात्र मोकळ्या मनाने प्रत्येकाशी बोलणार. घरी आलेल्या कुणालाही त्या रिकाम्या हाती जाऊ देणार नाहीत. ‘दिल्याने वाढतं’ असं त्यांचं ब्रीदवाक्य माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढवतं. कधी त्यांचे विचार मला अगदी जुनाट वाटतात तर कधी त्या असं काहीतरी बोलून जातात की वाटतं एवढे आधुनिक विचार तर आपणही करत नाही. नुसते विचारच नाही तर कृतीतूनही त्या वेळोवेळी त्यांच्या मनाचा आधुनिकपणा दाखवून देतात.
त्यांच्या रूपात मला एक सहवाचकही सापडलाय. माझ्या व्यतिरिक्त घरात कुणीतरी माझी पुस्तकं आवडीने बघतं आणि सवडीने वाचतं हे पाहून मला आनंदच होतो. माझ्या कुठल्याही लेखाचं वाचन त्या अगदी आवर्जून करतात. माझं कुठल्याही बाबतीत कौतुक करत असताना हातचं राखून बोलताना मी त्यांना कधी पाहिलेलं नाही/फ. जे काही करणार ते अगदी मनापासून! स्वयंपाकघराबाबत मात्र त्या थोडय़ा आग्रही आहेत, पण मीसुद्धा मध्ये लुडबुड करून आपली संधी मिळवतेच! मी केलेल्या पदार्थाचंही त्या तितक्याच प्रामाणिकपणे परीक्षण करतात आणि मोकळेपणे प्रतिक्रियाही देतात. सुनेशी कसं वागायचंय हे त्यांना आणि सासूशी कसं वागायचं नाही हे मला पक्कं ठाऊक आहे. त्यामुळे आमच्यातल्या संभाषणात आणि वागण्यात सहजता दिसून येते.

हे सगळं इथे लिहिण्यामागे माझ्या सासूबाईंवर स्तुतिसुमनं उधळून त्यांच्याकडून कौतुक करून घेण्याचा माझा उद्देश नाही तर थोडासा समजूतदारपणा आणि संवादकौशल्य आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोप्या करू शकतं, हे सांगण्याचा आहे. माहेरी असते ती ‘आई’ आणि सासरी असते ती ‘सासू’ हा जुनाट आणि बिनबुडाचा समज आता नाहीसा व्हायला हवा. एकाच जन्मात आपल्याला दोन आईंची माया मिळणं भाग्याचंच मानलं पाहिजे. त्याचप्रमाणे घरात मुलगी असेल तर तिला बहीण म्हणून आपली सून घरात आली आहे आणि नसेल तर मुलगीच बनून घरात आली आहे, असा सकारात्मक विचार जर सासवांनी केला तर त्या टीव्ही मालिकावाल्यांच्या तोंडात मारून दोघींनाही सुखाने संसार करणं नक्की शक्य होईल.
तृप्ती एकबोटे-देवरूखकर

मधुचंद्राचे मंतरलेले दिवस

मधुचंद्राचे मंतरलेले दिवस

फेब्रुवारी महिना उजाडला आणि सगळीकडे प्रेमाचे वारे वाहू लागलेत. गुलाबी थंडीत रस्त्यांच्या कडेला असणा-या दुकानांपासून ते मेल बॉक्समध्ये येणा-या हजारो ऑफर्सच्या ई-मेल्सपर्यंत संपूर्ण माहोल लाल-गुलाबी झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हनिमून अर्थातच मधुचंद्र या फारशा लिहिल्या-बोलल्या न जाणा-या विषयावर थोडं लिहायचा प्रयत्न करतेय. माझ्या मधुचंद्राच्या काही मधुर आठवणी तुमच्यासोबत इथं शेअर करतेय.

हनिमून म्हणजेच मधुचंद्र ही संकल्पना ज्याने कुणी निर्माण केली असेल तो खरंच ग्रेट असला पाहिजे. आपण अजूनही या विषयावर हळूहळू कानगोष्टीच करतो, पण खरं तर या सुंदर अनुभवाबद्दल बोललंच पाहिजे. ‘आमच्या वेळी नव्हतं हो असलं काही’ असं म्हणणारी पिढी आता जवळजवळ संपुष्टात आली आहे आणि आपली पिढी या शब्दाला चांगलीच सरावली आहे. थोडक्यात ‘हनिमून पिरीयड’ म्हणजे आपल्या भाषेत नव्याचे नऊ दिवस!
असो, असं म्हणतात की, कुठल्याही व्यक्तीची खरी ओळख प्रवासादरम्यानच होते. म्हणूनच शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींची मैत्री सहलीनंतर अधिक घट्ट होते. वर्षातून एकदा तरी एकत्र सहलीला जाणा-या कुटुंबांमध्येही हे पाहायला मिळतं. म्हणूनच दोन अनोळखी व्यक्तींची एकमेकांशी खरी ओळख होण्यासाठी प्रवासाहून अधिक योग्य काही असूच शकत नाही.आपण ‘मधुचंद्र’ ही संकल्पना खूपच साचेबद्ध करून टाकली आहे. नवीन नवरा-नवरीने ख-या अर्थी वैवाहिक आयुष्याची सुरुवात करण्यासाठीची सहल एवढाच अर्थ यातून अनेकांना अभिप्रेत असतो. हा अर्थ कितीही योग्य असला तरी तो तेवढाच नाहीए एवढं नक्की! खरं तर एकमेकांचा सहवास हा मधुचंद्राच्या संपूर्ण प्रथेतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एकदा दैनंदिन जीवनाला सुरुवात झाल्यानंतर एकमेकांसाठी असा खास राखीव वेळ फार कमी वाटय़ाला येतो. त्यामुळे लग्नानंतरचे हे काही दिवस फक्त आणि फक्त एकमेकांसोबत घालवणं अत्यावश्यक आहे.
हनिमूनचा सरसकट अर्थ नवदाम्पत्याने एकमेकांसोबत पहिल्यांदा प्रवासाला जाणं एवढाच असला तरी त्यात अनेक छोटय़ा-मोठय़ा मजेदार गोष्टीही दडलेल्या आहेत. कदाचित म्हणूनच या विषयावर सिनेमे बनवण्याची कल्पनाही काही निर्मात्यांना सुचली असावी. पण सिनेमा आणि वास्तव यात खूप फरक असतो. म्हणजे हनिमूनला गेल्यानंतर डोंगर-द-यांमध्ये जाऊन गाणीबिणी गाणं असं वास्तवात काही होत नसतं. पण ही सहल ‘आइस ब्रेकर’चं काम मात्र नक्कीच करते. म्हणजेच नवीन जोडप्यात असलेला वागण्या-बोलण्यातला एक प्रकारचा संकोच या सहलीमुळे दूर होतो. शिवाय लग्नाच्या तयारीमुळे, विधींच्या गडबडीमुळे आणि पाहुण्यांच्या गजबजाटामुळे थकून गेलेल्या मनाला आणि शरीराला आलेला शीण घालवण्यासाठी ही सहल हवीच!आपल्याकडे ही संकल्पना अर्थात पाश्चिमात्य देशांकडून आली आणि कालौघात लग्नाशी निगडित आपल्या इतर अनेक प्रथा-पद्धतींपैकी एक होऊन आपलीशी झाली. म्हणूनच लग्न ठरल्यापासूनच ‘हनिमूनला कुठे जाणार’ अशी विचारणा नातेवाइकांपासून मित्र-मैत्रिणींपर्यंत सगळ्यांकडून सुरू होते. जणू काही लग्नाच्या बैठकीत सर्वात आधी हाच मुद्दा चर्चेला घेतलेला असतो. माझ्या निरीक्षणाप्रमाणे तर इतरांनाच वधू-वरांच्या या सहलीचं जास्त कुतूहल असतं. ते दोघं बिच्चारे तर या विषयावर एकमेकांशी बोललेलेही नसतात.
आधी हा विषय काढायलाच मुळात अवघडल्यासारखं वाटत असतं. सुरुवात कुणी करायची, असा प्रश्न पडलेला असतो. साखरपुडा झाल्यानंतर कसाबसा हा विषय निघतो. त्यानंतर जायचं कुठे, हा यक्षप्रश्न अनेक जोडप्यांना पडलेला दिसतो. सहसा नवरदेवच या संपूर्ण सहलीचं आयोजन करत असल्यामुळे नियोजित लग्नांमध्ये काही वेळा मुलीला फक्त कुठे जाणार आहोत हे सांगितलं जातं, विचारलं जात नाही. पण बरेचदा मुलगा-मुलगी या गोष्टी मिळूनच ठरवतात आणि त्यातच खरी गंमत आहे.आमचं लग्न ऐन सहलींच्या सिझनमध्ये, म्हणजे डिसेंबरमध्ये झाल्यामुळे ऑगस्टमध्ये साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी लगेच आम्ही हनिमूनसाठी स्थळसंशोधनाला लागलो. आम्हा दोघांनाही डोंगर-द-यांपेक्षा समुद्रकिनारे अधिक प्रिय असल्याने उत्तरेकडचा भारत आमच्या यादीतून आधीच बाद झाला होता. दक्षिणेतली अनेक बेटं आणि दक्षिण भारतातल्या अनेक सहलींच्या वेळापत्रकांची चाचपणी करूनही मनासारखं काहीच हाती लागत नव्हतं. असाच ऑक्टोबर महिना उजाडला. आता मात्र आम्हाला डिसेंबरमधलं बुकिंग मिळण्याची शक्यता खूपच कमी झाली होती. एवढय़ात एका मित्राने मागच्या वर्षी त्याच्या हनिमूनचं बुकिंग केलेल्या कंपनीची माहिती आम्हाला दिली. तरी अजून ठिकाण निश्चित व्हायचं होतंच.
मग आम्ही दोघांनी एकत्र बसून थोडी चर्चा केली आणि ३-४ दिवसांसाठी प्रचंड खर्च करून कुठेतरी लांब जाऊन दिवसभर स्पॉट्स बघत हिंडून आणखी दमण्यापेक्षा ओळखीच्याच पण दोघांच्याही आवडत्या ठिकाणी चांगलं आठवडाभरासाठी जाण्याच्या विचारावर एकमताने शिक्कामोर्तब झालं. कारण आम्हाला पर्यटनस्थळं बघत दिवसभर फिरत राहण्यापेक्षा एकमेकांसाठी अधिक वेळ हवा होता. मग अर्थात आमचं गोव्याला जाण्याचं नक्की झालं.अर्थात, इथे जाण्याआधीही अनेकांनी आमचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलाच पण आम्ही मात्र कुणाचं काहीही ऐकायचं नाही असं ठरवलंच होतं. मैत्री तर आमची आधीच झालेली होती. त्यामुळे ही सहल आम्ही भरपूर एंजॉय करणार होतो, यात शंकाच नव्हती.
गोवा आम्ही दोघांनीही आधी पाहिलेलं असलं तरी यावेळी ते आम्हाला नवीन भासत होतं. भारतीय पर्यटकांमध्ये फारसं प्रसिद्ध नसलेल्या ‘केंडोलीम’ नावाच्या गोव्यातल्या एका सुधारित गावात आम्ही राहिलो होतो. थिविम स्टेशनला उतरून या गावात जाण्यासाठी पुढे एक-दीड तासाचा प्रवास करावा लागतो. रिसॉर्टवाल्यांनी स्टेशनवरून आणण्यासाठी गाडी पाठवली होतीच. आम्हाला पाहिल्यावर तिथल्या मराठी स्थानिकांना मात्र खूप आनंद व्हायचा. आमच्या तिथल्या गाडीचा ड्रायव्हर व आम्ही रात्री जेवायला जायचो. तिथल्या वेटरसह अनेक मराठी भाषिक आमची आपुलकीने चौकशी करत, कारण इंग्रजी किंवा गोवन-कोकणी भाषा बोलणा-यांचं प्रमाण या भागात अधिक असल्याने मराठी बोलणारे पर्यटक तिथे आल्यावर त्यांना अप्रूप वाटतं. तिथे रशियन पर्यटकांचा सुळसुळाट इतका आहे की भारतीय पर्यटक अगदी क्वचितच नजरेस पडतात. इतकंच काय तर तिथल्या प्रत्येक रेस्टॉरंटच्या बाहेर दिवसाचा मेन्यू इंग्रजीसोबत रशियन भाषेतही लिहिलेला आहे. मग मेन्यूमध्ये रशियन पदार्थ नसतील तर नवलच! पण तिथल्या रशियन सुळसुळाटाचा एक फायदा मात्र असा की, त्यांच्या इथल्या वास्तव्यामुळे इथल्या हॉटेल्समध्ये उत्तम आणि तत्पर सोयी-सुविधांपासून वाइनपर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं. दोन मोठ्ठी चकाचक सुपरमार्केट, एका कॉलवर रिसॉर्टच्या दारात हजर होणारी गाडी अशा अनेक सुविधा या छोटय़ाशा गावातही उपलब्ध झाल्या आहेत. यासोबतच आम्हाला अत्यंत आवश्यक असलेली शांतता इथे लाभली कारण हे विदेशी पर्यटक मुळात शांतताप्रिय असतात. आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहत होतो तिथले अनेक अपार्टमेंट्स तर काही रशियन पर्यटकांनी विकतच घेतलेले आहेत. ते सुट्टीमध्ये इथे येऊन इथल्या सुंदर, शांत समुद्रकिना-यावर आपला वेळ मजेत घालवतात.
विशेषत: इथली संध्याकाळ अत्यंत सुंदर होती. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेली, समुद्रकिना-यावर दूरवर पसरलेली अशी रेस्टॉरंटस दृष्टीस पडायची. दिवसा अगदी साधारण वाटणारी, बाहेरून मोकळी असलेली ही कौलारू रेस्टॉरंट्स आणि दुकानं संध्याकाळी मात्र नवीन आणि वेगळंच रूप परिधान करायची. दर संध्याकाळी प्रत्येक रेस्टोरंटमध्ये तिथले स्थानिक कलाकार इंग्रजी, रशियन तर कधी हिंदी गाणी सादर करत. तिथल्या मंद दिव्यांच्या आणि संगीताच्या साथीने मन धुंद होऊन जात होतं. दरम्यान, नाताळ जवळ आलेला असल्यामुळे संपूर्ण वातावरणात एक अनोखं चैतन्य भरलेलं होतं. इथल्या शांत, सुंदर वातावरणात आमचंही नातं फुलत होतं. दिवसागणिक एकमेकांच्या सवयी, आवडी लक्षात घेऊन, एकमेकांची काळजी घेत खरं तर आम्हीच एकमेकांसाठी सवयीचे होत होतो. हे दिवस खरंच मंतरल्यासारखे भासत होते.

अशाच एका निवांत संध्याकाळी आम्ही फिरून रिसॉर्टवर परतत होतो. गल्लीत वळलो आणि समोर काळ्या-निळ्या आसमंताच्या पार्श्वभूमीवर पूर्णाकृती चंद्र एका अनोख्याच तेजाने चकाकत असलेला दिसला किंवा मला तो तसा भासत होता. माझी नजर आणि मन त्याच्या दर्शनाने प्रचंड सुखावले होते. तो मनात खोल-खोल उतरत चालला होता आणि माझ्या हातात माझ्यावर अतोनात प्रेम करणा-या माझ्या जन्माच्या जोडीदाराचा हात होता. त्या संध्याकाळी, त्या ठिकाणी, मला ‘मधुचंद्र’ या शब्दाचा खरा अर्थ समजला होता.
तृप्ती एकबोटे-देवरूखकर

Thursday, 30 January 2014

थोडं तुझं, थोडं माझं!

थोडं तुझं, थोडं माझं!

कुठल्याही लग्नाच्या नंतरचा काही काळ मुलीसाठी आणि त्या घरातल्या माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जर या दिवसांमध्ये एकमेकांना समजून, सांभाळून घेतलं नाही तर पुढे त्याचे अप्रिय परिणाम होताना दिसतात. परक्या घरातून आलेली परकी मुलगी आपलीशी करण्यासाठी घरातल्यांनी आणि नवं घर आपलंसं करण्यासाठी मुलीने, अशा दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणं आवश्यक असतं.


आपण आपल्याच तंद्रीत जगत असतो. घर, ऑफिस, मित्र-मैत्रिणी, शॉपिंग, सिनेमे, पिकनिक्स, पार्टीज असं सगळं नियमित सुरू असतं आणि एक दिवस ‘अचानक’ आपलं लग्न होतं. हो, लग्नाची तयारी कितीही दिवस सुरू असली तरी लग्न ‘अचानक’च झाल्यासारखंच वाटतं पण आपल्या आयुष्यात खूप मोठी उलाढाल झाली आहे हे लक्षात यायला मात्र थोडा वेळ लागतो. आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तो आपल्या लग्नाचा दिवस येतो आणि निघूनही जातो पण खरी कसोटी सुरू होते त्यानंतर!
नव्या घरात जुळवून घेण्यासाठी कुणाला किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही. ते प्रत्येकाच्या स्वभावावरही अवलंबून आहे. लग्न ठरल्यानंतर काही दिवसांतच माझं मात्र इथल्या घरातल्या लोकांबरोबर चांगलंच ‘टयुनिंग’ झालं होतं. त्यामुळे मला इथे रुळायला तसा वेळ लागला नाही. पण फक्त घरातल्या माणसांसोबत सूर जुळून भागत नाही तर संपूर्ण राहणीमान जुळवून घ्यायचं असतं. भाजीच्या चवीपासून कपडय़ाच्या घडीपर्यंत सगळंच नवीन असतं. या नावीन्याचं अप्रूपही वाटत असतं आणि दडपणही येत असतं. माझं लग्न ठरल्यापासून मी आजूबाजूच्या लग्न झालेल्या स्त्रियांचं उगीच निरीक्षण करू लागले होते. त्या कशा वागतात, कसे कपडे घालतात, लग्नानंतरच्या अनुभवांबद्दल काय बोलतात वगरे पण त्यामुळे माझा संभ्रम अजून वाढत होता. कारण मला लग्न झाल्यानंतर आयुष्य आणखी सुंदर होतं, असं सांगणारं जवळजवळ कुणीच सापडलं नाही. प्रत्येक जण तक्रारींचा मोठा खजिनाच माझ्या समोर घेऊन येऊ लागला.
‘‘काही नाही गं, एकदा लग्न झालं की बाईचं स्वत:चं काही आयुष्य उरतंच नाही, येईल तुलासुद्धा अनुभव!’’ असं लग्नाला काही र्वष होऊन गेलेल्या माझ्या मैत्रिणींनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा तर मी पुरतीच हादरले. आपण लग्नाची घाई तर करत नाही ना, आपलं स्वत:साठीचं आयुष्यच संपून जाणार, अजून कितीतरी गोष्टी करायच्या बाकी आहेत, कुठून सुरुवात करू, लग्नाआधी काय काय करू अशा प्रश्नांनी मला भंडावून सोडलं होतं. माझी ही अवस्था पाहून माझ्या नव-याने मला विश्वास दिला की तुझ्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड मी कधीही येणार नाही. अनेकांना या फक्त बोलायच्या गोष्टी वाटतात पण गेल्या ६-७ महिन्यांत मी हे प्रत्यक्ष अनुभवलं आहे. खरं तर या बाबतीत सासरकडच्या लोकांना आणि नवीन सुनेला, दोघांनाही काही गोष्टींची जाणीव असणं फार गरजेचं आहे. मी लग्नाआधी जीन्स आणि टीशर्ट किंवा कुर्ती असे सुटसुटीत कपडे घालण्याला प्राधान्य देत होते पण लग्नानंतर माझी वेशभूषा थोडी तरी बदलणार यासाठी मी मनाची आधीच तयारी केली होती. लग्नानंतर काही दिवस साडय़ा, मग ड्रेसेस आणि आता ऑफिसमध्ये किंवा नव-यासोबत फिरायला जाताना मी सर्रास जीन्स वापरते. महत्त्वाचं म्हणजे त्यावर कुणी आक्षेप घेत नाही कारण मी देखील सवय नसताना साडय़ा आणि ड्रेसेस कटकट न करता घातले आणि आता मला त्याची सवयसुद्धा झाली आणि आवडूही लागलं आहे. याला तडजोड नाही म्हणता येणार तर हा दोन्ही बाजूंचा समजूतदारपणा आहे.
याबाबतीत अनेकदा मुलाला आणि सुनेला वेगवेगळे कायदे लागू झालेले मी पाहिले आहेत. म्हणजे मुलगा रात्री घरी कितीही वाजता आला तरी हरकत नाही पण सुनेला अर्धा तास उशीर झाला तरी त्याचा मोठा विषय अनेक ठिकाणी होतो. घरातली कामं करण्याबाबतही तसंच! माझा एक सहकारी तर पुरुषांनी घरातली कामं करण्याच्या पूर्ण विरोधात आहे आणि अशा मानसिकतेच्या अनेक व्यक्ती आपल्याला आसपास पाहायला मिळतात. खरं तर या गोष्टी आई-वडिलांनीच आपल्या मुलांना शिकवायच्या असतात. सहजीवन म्हणजे ‘तू कर, मी फक्त खातो’ असं होत नाही. माझ्या नव-याने लग्नाआधी जेव्हा मी घरातली सगळी कामं करतो असं मला सांगितलं तेव्हा खरं तर माझा अजिबात विश्वास बसला नव्हता पण आता मी हे खरंच अनुभवतेय. माझ्या घरातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याही कामात त्याचा मदतीचा हात कायम पुढे असतो आणि मला या गोष्टीचा अभिमानही वाटतो आणि माझा त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो. आता, ‘‘या गोष्टी लग्न नवीन आहे म्हणून काही दिवसांपुरत्याच आहेत’’ असं मला अनेकांकडून सांगितलं जातं पण निदान त्याची कामात मदत करण्याची तयारी आहे, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे.
गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणून काही एका दिवसात लगेच मुलीची बाई होत नाही. काल-परवापर्यंत आई-वडिलांच्या घरात बिनधोकपणे कुठल्याही जबाबदारीशिवाय बागडणारी मुलगी जेव्हा संपूर्ण अनोळखी घरात कायमची येते तेव्हा एका दिवसात तिला सगळं काही येण्याची, तिचा स्वभाव, सवयी, आवडी-निवडी बदलण्याची अपेक्षा करणं योग्य नाही. तिला थोडा वेळ द्यायला हवा. ती पुढाकार घेऊन एखादी गोष्ट करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. मुळात घरी आलेली सून ही आपल्या कुटुंबाचा भाग आहे, हेच अनेक लोक मान्य करत नाहीत. अनेकदा तिने उत्साहाने केलेल्या गोष्टींना किंवा पदार्थाना ‘‘आमच्याकडे हे असं नाही करत’’ असं म्हणून तिचा हिरमोड केला जातो. तिच्याकडून अजाणतेपणी झालेल्या लहान-सहान चुकांचाही मोठा विषय केला जातो. मग कालांतराने तिचा घरात काही करण्याचा उत्साहच मावळतो आणि मग सून घरात काही करतच नाही असा शिक्कामोर्तबही तिच्यावर केला जातो. मी हे माझ्या जवळच्या अनेक कुटुंबांमध्ये होताना पाहिलं आहे.
अनेकदा मुलीही हीच चूक करतात. मग ‘आमच्याकडे’ असं आणि ‘तुमच्याकडे’ तसं या वादात ही कुटुंब कायम अडकून पडतात आणि कालांतराने नात्यांमधली दरी रुंदावत जाते. जेवण, सणवार, व्रत-वैकल्यांच्या बाबतीत माहेरच्या पद्धतींना चिकटून राहण्यापेक्षा नवीन घरातल्या नवीन पद्धती शिकून त्या पुढे चालू ठेवणं केव्हाही इष्टच! मी आणि माझ्या नव-याने सुरुवातीपासूनच काही गोष्ट जाणीवपूर्वक टाळल्या आणि काही सवयी मुद्दाम लावून घेतल्या. जसं, आम्हा दोघांपैकी कुणीही ‘माझे’ किंवा ‘तुझे’ असा नातेवाइकांबद्दल, घराबद्दल, वस्तूंबद्दल उल्लेख केला की आम्ही लगेच एकमेकांना टोकतो. जे काही आहे ते ‘आपलं’ आहे आणि माझ्या अनुभवानुसार याचा खरंच आपल्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या मानसिकतेवर खूप सकारात्मक परिणाम होतो. खरं तर, लग्न म्हणजे नवरा-नवरीसोबत घरातल्या प्रत्येकासाठीच आयुष्याच्या एका नवीन पर्वाची सुरुवात असते, आईची सासू होत असते, वडिलांचे सासरे होत असतात तर बहिणीची नणंद होत असते. नात्यांमध्ये होणारे हे सगळे बदल ठरवलं तर खूप सुखदायी होऊ शकतात. एकमेकांकडचं चांगलं ते घेऊन, या नवीन पर्वाची सुरुवात केली तर सगळ्यांसाठीच गोष्टी सुकर होतात.

मी स्वत:ला माझ्या सासरच्या घरात एकरूप करण्यासाठी काही गोष्टी प्रयत्नपूर्वक करते. तसेच प्रयत्न मला सामावून घेण्यासाठी इथली माणसंही करताना दिसतात. या घरात रुळण्यासाठी आवश्यक वेळ इथल्या लोकांनी मला दिला आहे आणि मला त्यांच्यात एकरूप करून घेण्यासाठी मीही त्यांना तितकाच वेळ देत आहे आणि मला खात्री आहे की पुढे हा वेळच आमच्यातली नाती भक्कम करणारा दुवा ठरणार आहे.

तृप्ती एकबोटे-देवरुखकर

नाव ठेवावे का?

नाव ठेवावे का?

आपण जन्माला येतो ते निव्वळ एक बाळ म्हणून, आपलं नाव आपल्याला ओळख मिळवून देतं. कुठल्याही मुलीच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक असलेलं, प्राणपणाने जपलेलं, कुणी प्रेमाने ठेवलेल्या टोपणनावाचं मूळ असलेलं नाव एका झटक्यात केवळ लग्न झालं म्हणून तिची मर्जीही न जाणून घेता बदलून टाकणं, अशा विचित्र प्रथा आपल्याकडच्या लग्नांमध्ये का असतात, याचं उत्तर कदाचित कुणाकडेही नसावं...

माझ्या या सदरातल्या पहिल्या म्हणजेच गेल्या गुरुवारच्या लेखाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम वाचकांचे खूप खूप आभार! माझा तो लेख वाचून माझी आई खूपच भावूक झाली होती. मी माझ्या नावात दोन्हीकडची आडनावं लावली या गोष्टीचं तिला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं. त्यावर मी तिला म्हटलं की, हे तर स्वाभाविकच आहे कारण जर तुम्ही मला लिहायला-वाचायला शिकवलंच नसतं तर मी कधी हा लेख लिहूच शकले नसते. तिला आणि बाबांना मात्र माझ्याकडून अगदी सहज घडलेल्या या कृतीचा खूप अभिमान वाटला. तिच्याशी झालेल्या त्या संभाषणानंतर एका गोष्टीची मला प्रकर्षाने जाणीव झाली,आपण कितीही म्हटलं की ‘नावात काय आहे’ तरी आपलं नाव हा आपल्या अस्तित्वाचा सर्वात मोठा घटक असतोच. आपल्याकडे लग्नातही नाव या विषयाशी निगडित अनेक गमतीजमती असतात. म्हणजे नाव घेणं, बायकोचं नाव बदलणं, नव-याला नावाने हाक मारणं ते अगदी ‘नावं ठेवणं’, सगळ्यातच नावाची भूमिका मोठी! नावात काय आहे हे खरं तर या वेळी उमगतं.
जेव्हा माझं नाव लग्नानंतर बदलण्याचा विषय समोर आला तेव्हा मी त्याला सपशेल नकार दिला होता. सुदैवाने त्यासाठी मला कुणाची मनधरणी करावी लागली नाही की जीवाचा आटापिटा करावा लागला नाही. माझ्या विचारांचा माझ्या नव-याने आणि सासरच्यांनी आदर केला आणि माझ्या आई-वडिलांनी माझ्या जन्मानंतर कौतुकाने सोहळा करून ठेवलेलं माझं नाव कायम राहिलं. एकदा माझ्या नव-याने मला ‘काय हरकत आहे नाव बदलायला’ असं गमतीने विचारलं. त्यावर मी त्याला इतकंच म्हटलं की ‘मुलीचं लग्नात नाव बदलण्यामागचं एक तर्कशुद्ध कारण तू मला दे आणि खुशाल माझं नाव बदल.’ त्यानंतर पुन्हा जेव्हा हा विषय निघाला तेव्हा मी त्याला विचारलं की ‘आता, तुझ्या वयाच्या २८व्या वर्षानंतर मी अचानक एक दिवस तुझं नाव बदललं तर तुला कसं वाटेल?’ मला आठवतं, त्या दिवसानंतर आमच्या बोलण्यात हा विषय कधीच आला नाही. एवढंच काय, तर लग्नाच्या वेळी जेव्हा ‘काय नाव ठेवणार रे!’ अशी त्याच्या नातवाईकांकडून विचारणा झाली तेव्हा तो परस्परच कशाला बदलायचं नाव, हे नाव चांगलंच आहे असं म्हणू लागला. याचाच अर्थ माझं म्हणणं त्याला पटवून देण्यात मी शंभर टक्के यशस्वी झाले होते.
लग्नात मुलीचं नाव बदलण्यामागचं तर्कशुद्ध कारण आपल्यापैकी कुणालाच माहीत नसावं. पूर्वापार एखादी पद्धत चालत आली आहे म्हणून एखादी गोष्ट करायची, याला खरं तर काहीच अर्थ नाही. ज्या नावाने मुलीच्या अस्तित्वाला पहिल्यांदा ओळख मिळाली ते नाव बदलणं म्हणजे तिचं लग्नाआधीचं अस्तित्वच नाकारण्यासारखं नाही का? कदाचित ही पद्धत सुरू होण्यामागचं कारणही हेच असेल. कारण आपल्या समाजव्यवस्थेत मुलीने नवीन आयुष्याची सुरुवात करताना सहसा तिच्या संपूर्ण भूतकाळाची लग्नाच्या होमकुंडात आहुती द्यायची अशी पद्धत आहे, त्यात नावही आलंच.
काही जणींना ही काही फार मोठी गोष्टच नाही, असं वाटतं, पण मैत्रिणींनो, आपला जन्म झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांनी किती कौतुकाने अनेक नावांचे अर्थ शोधत, काही नावांवरून एकमेकांशी वाद घालून मग कुठे एक नाव आपल्यासाठी ठरवलं असेल. अत्यंत प्रेमाने, धुमधडाक्यात बारसं करून आपल्याला हे नाव दिलं असेल. आपण आजवर कमावलेली सगळी प्रशस्तीपत्रकं, बक्षिसं एवढंच काय तर मोबाइल, इंटरनेटचं बिल आणि अगदी बँकेतलं खातंदेखील ज्या नावावर आहे, ते नाव अचानक कुणीतरी केवळ आपल्यावर स्वत:चा हक्क प्रस्थापित करण्यासाठी म्हणून बदलत असेल तर ते योग्य नाही. मुळात आपली ओळख परस्पर बदलण्याचा अधिकार कुणालाच नाही.
आता हा लेख वाचणा-या अनेक काकूंना हे आगाऊपणाचं वाटत असेल खरं, पण निदान माझं नाव बदलण्याचा विषय झाला होता तेव्हा माझ्या डोक्यात हे सारे विचार आले होते. अगदी असंच प्रत्येकाला वाटावं हे काही गरजेचं नाही. कुणी सांगावं, काही जणींना कदाचित त्यांचं नाव आवडतही नसेल आणि निदान लग्नाच्या निमित्ताने ते बदलतंय म्हणून त्या खूशही होत असतील. आडनावाचंही थोडय़ाफार प्रमाणात तसंच आहे, पण आपण एका नवीन कुटुंबाचा भाग होत असताना त्यांची ओळख आत्मसात करण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला ती आपल्याकडून मिळण्यासाठी सासरकडचं आडनाव स्वीकारायलाच हवं. परंतु माझ्या मते, त्यासाठी माहेरच्या आडनावाचा त्याग करण्याची काहीच आवश्यकता नाही. लग्न म्हणजे आपल्याला विधी, कपडे, आमंत्रणं, दागिने, नवं घर असं सगळं वरवरचंच वाटत असतं, पण खरं तर लग्न या सगळ्याहून खूप वेगळा, असा छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा, अनुभवांचा, नव्या-जुन्या विचारांचा आणि प्रथांचा एकत्रित सोहळा असतो.
मुलीला एकीकडे आईबाबांचं घर सोडून जायचं म्हणून वाईट वाटत असतं आणि दुसरीकडे नव्या घरात सासू-सासऱ्यांना, नव-याला हाक काय मारायची, इथपासून सगळे प्रश्न पडलेले असतात. मी तर सासू-सासऱ्यांना लग्न ठरल्यापासूनच आई-बाबा बनवलं आणि नव-यालाही सुरुवातीपासून नावाने हाक मारत होते त्यामुळे पुढे तेच कायम राहिलं. माझ्या सासरी खरं तर या गोष्टीवर कुणाचाही आक्षेप नाही पण माहेरी मावशी, आजी वगरे मला अनेकदा म्हणतात ‘अगं, नावाने काय हाक मारतेस, ‘अहो’ म्हणावं’ आणि त्यावर माझं उत्तर असतं की, तोसुद्धा मला ‘अगं’ऐवजी ‘अहो’, तृप्ती, ऐकलंत का? असं म्हणणार असेल तर मला ‘अहो’ म्हणायला काहीच हरकत नाही.’ माझ्या या उत्तरामुळे मी त्यांना अनेकदा अगोचर वगरे वाटते, पण चालायचंच! मला वाटतं, प्रश्न जर मान देण्याचाच असेल तर तो दोघांनीही एकमेकांना द्यायला हवा. नाहीतर समोर असताना ‘अहो’ म्हणायचं आणि इतर वेळी ऑफिसमध्ये, माहेरी, ट्रेनमधल्या मैत्रिणींसमोर ‘तो माझा नवरा’ असं म्हणायचं. त्यापेक्षा मी चारचौघांमध्ये बिनदिक्कत ‘माझा सागर’ असा प्रामाणिकपणे माझ्या नव-याचा उल्लेख करते. त्यात मानही आला आणि प्रेमही!


माझ्या निरीक्षणाप्रमाणे एकमेकांना नावाने हाक मारणा-या जोडप्यांच्या नात्यामध्ये एक वेगळीच सहजता आणि पारदर्शकता दिसते. याउलट नव-याला ‘अहो’ आणि बायकोला ‘अगं’ म्हणणा-या जोडप्यांमध्ये कायम एक असमानता राहते. आपल्याकडे बाईला ती पुरुषापेक्षा सर्वार्थाने कमी आहे, कायम त्याच्यावर अवलंबून आहे, असं बजावण्यासाठी म्हणूनच अशा पद्धती रूढ करण्यात आल्या असाव्यात, असं माझं ठाम मत आहे. आपल्या रूढी-परंपरांचा मीही प्रचंड आदर करते पण जे निर्थक आणि असमानता निर्माण करणारं आहे ते सोडून देणंच योग्य! नव-याबद्दलचा आदर ही दाखवण्याची नाही तर बाळगण्याची गोष्ट आहे. नवरा-बायकोचं नातं हक्काचं, मैत्रीचं आणि पारदर्शक असलं तर पुढची वाट सुकर होते. त्याची सुरुवात नावापासून होते असं म्हणायला हरकत नाही कारण कुठलंही स्थळ आलं की आपण आधी नाव विचारतो आणि म्हणूनच एकमेकांच्या नावांचा आदर करून एकमेकांना नावाने संबोधणं ही खरं तर एका सुंदर नात्याची सुरुवात होऊ शकते.

गोष्ट माझ्या लग्नाची

गोष्ट माझ्या लग्नाची

लग्न ठरणं, लग्न पार पडणं आणि लग्नानंतरचं नवं-कोरं आयुष्य हे एकाच गोष्टीचे तीन वेगवेगळे पदर आहेत. तिन्हीतली पात्र तीच फक्त परिस्थिती वेगवेगळी. या गोष्टीत कुटुंब, प्रेम, भावना, नाती असं सगळं काही अनुभवता येतं आणि तेही प्रत्यक्षात..! मी अगदी हल्लीच लग्नाच्या मांडवाखालून गेले असल्यामुळे थोडंफार निरीक्षण आणि बरचसं आत्मपरीक्षण केल्यानंतर माझ्या मनाच्या तिजोरीत साठलेले लग्न आणि त्याच्याशी संबंधित अनेक मजेदार किस्से आणि अनुभव तुमच्याशी या सदरात शेअर करणार आहे.


‘हाती मेंदी, डोळा पाणी;
उरी हुंदका, मनात गाणी’
मनाची अशीच काहीशी अवस्था मी अगदी काही दिवसांपूर्वीच अनुभवली. लग्नाला आत्ताच एक महिना पूर्ण झाला आहे, त्यामुळे अजूनही मी नववधू म्हणूनच सगळीकडे मिरवतेय. खरंतर, परीकथेतील ‘त्या’ राजकुमाराचं चित्र मनात पूर्ण होण्याआधीच माझं लग्न ठरलं. ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेला आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्या दिवसाला सहा महिने पूर्ण झाले. या सहा महिन्यांमध्ये माझं, खरंतर आम्हा सगळ्यांचंच आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. सहा महिन्यांपूर्वी एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी असलेले आम्ही दोघं, आमच्याही नकळत एकमेकांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक बनलो. मला वाटतं हीच नियोजित (अरेंज्ड) लग्नांची गम्मत आहे.
आधी एक औपचारिक भेट, मग मेसेजेस, मग तासन्तास फोनवर मारलेल्या गप्पा, दर विकेंडला भेटण्याची ओढ, कधी जेवणाचा प्लान तर कधी सिनेमाचा, कधी नुसतंच समुद्रकिनारी बसून केलेलं स्वप्नरंजन.. खरं तर लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंतचा काळ या सगळ्यात खूप पटकन निघून जातो. पण दोघांचं नातं फुलण्यासाठी हाच काळ सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यावश्यक असतो. त्यामुळे साखरपुडा आणि लग्न यात किमान चार महिन्यांचं अंतर असावं असं मला तरी वाटतं.
लग्नाच्या या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ती ‘मुलगा पाहणं’ या पारंपरिक तरी अत्यंत मनोरंजक कार्यक्रमाने. मला नेहमी असा प्रश्न पडायचा की लग्नासारखा, संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असलेला निर्णय असा अध्र्या तासाच्या भेटीत कसा घ्यायचा? पण माझ्या वेळी ती अध्र्या तासाची भेट आम्ही दोघंही बडबडे असल्यामुळे दोन तासांची झाली आणि आमचा निर्णय घरी पोहोचेपर्यंत जवळजवळ पक्का झाला होता. खरंतर आमच्या घरच्यांनी पारंपरिक कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला बगल देत आधी आम्ही दोघांनीच भेटावं असं ठरवलं. त्यामुळेच आम्हाला एकमेकांशी अधिक मोकळेपणाने बोलता आलं, स्वभावांचा अंदाज आला, विचार कळले आणि आमची पहिल्याच भेटीत चक्क मैत्री झाली. त्यामुळे माझा मुलगा बघण्याचा आणि त्याचा मुलगी बघण्याचा, इतरांना सहसा बोअिरग वाटणारा, कार्यक्रम आमच्यासाठी इंटरेस्टिंग झाला होता.
एरवी कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात त्या बिचा-या मुला-मुलीला सोडून इतर गावगप्पाच अधिक होतात. इतक्यात कुणाला तरी कार्यक्रमाचा मूळ उद्देश आठवतो आणि मग ‘तुम्ही हवं तर प्रश्न विचारा एकमेकांना’ अशी मुभा दिली जाते पण एवढय़ा लोकांसमोर प्रश्न तरी काय विचारणार आणि उत्तरं तरी काय देणार! म्हणून मग काही न बोलता-विचारताच, केवळ दिसण्यावर आणि घरातल्या इतर व्यक्तींकडे पाहूनच एकमेकांना होकार किंवा नकार कळवण्याची वेळ येते आणि मग लग्नाचा जुगार खेळला जातो. म्हणजे जर जोडीदार चांगला निघाला तर डाव आपला नाहीतर सगळीच गणितं चुकतात आणि लग्नाच्या नावावर केवळ तडजोड म्हणून एका छप्पराखाली दोन व्यक्ती वर्षानुवर्ष एकत्र राहतात.
बरं, योग्य जोडीदाराची निवड करताना काही ठरावीक ठोकताळे, नियम वगरे नसतातच. बुद्धी अनेक गोष्टी पडताळत असते; पत्रिका, नोकरी, घर, घरातली माणसं, मित्र, व्यसनं असं बरंच काही, पण मन एक कौल देत असतं आणि ज्यांना तो कौल नीट ऐकता आला त्यांची निवड सहसा चुकत नाही.
एकदा लग्न ठरल्यावर मात्र अनेक गोष्टींचा मनात कल्लोळ सुरू होतो. प्रत्येक गोष्ट करत असताना लग्नानंतर आपल्याला आधी आपण करत असलेल्या गोष्टी करायला मिळतील का, असे विचार मनात येत राहतात. मैत्रिणींसोबत फिरताना, शॉिपग करताना, सिनेमा बघताना, ऑफिसला जाताना, अगदी मोठय़ा आवाजात हसतानाही. त्यात लग्न ठरल्यानंतर आजूबाजूच्या लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलेला असतो. एकीकडे आपल्यासाठी सगळे खूप आनंदी असल्याचं सांगून शुभेच्छा देत असतात आणि दुसरीकडे आधीच गोंधळून गेलेल्या मुलीला आणखी अस्वस्थ करण्याचा चंग बांधल्यासारखे वागतात. आपण कुठल्याही गोष्टीचा आनंद घेत असलो की, ‘करून घे मजा, आता लग्न व्हायचंय ना’ किंवा लग्न ठरल्यानंतर येणा-या प्रत्येक सणाला ‘हा तुझा शेवटचा सण’ असं काहीतरी विचित्र बोलत राहतात. माझं लग्न आहे की मी तुरुंगात शिक्षा भोगायला चालले आहे हेच मला अशा लोकांच्या बोलण्यावरून लक्षात येत नव्हतं.
त्यात आपल्याकडे ‘सासू’ या नात्याला उगीचच एक काळी, खलनायकी छटा देण्याची पद्धत आहे. लग्न ठरल्यापासूनच माझ्या ‘अनुभवी’ मैत्रिणी, बहिणी, शेजार-पाजारच्या, ऑफिसमधल्या बायका अशा समस्त स्त्री-जातीच्या प्रतिनिधींनी स्वत:चे अनुभव माझ्याशी शेअर करण्याच्या नावावर खरंतर मला घाबरवण्याचाच खूप प्रयत्न आरंभला होता. जेवणापासून, कपडय़ांपर्यंत आणि टिकलीपासून अगदी रोजच्या प्रवासाच्या सवयीपर्यंत ‘कळेल. कळेलच’ अशी एकच प्रतिक्रिया नियमित ऐकायला मिळत होती. काहीवेळा मी ‘माझा नवरा असा नाहीये, माझी सासू अशी नाहीये’ असं सांगण्याचा प्रयत्न केला पण संसाराचे ‘अनुभवी’ बोल बोलत असलेल्या माझ्या प्रिय सख्या त्यावरही ‘सहा महिने थांब फक्त, त्यानंतर हेच बोलतेस का बघूच’ असं मलाच आव्हान देऊ लागल्या. मग या लग्न-संसाराच्या खेळात अजून लिंबू-टिंबू असलेली मी, त्यांच्याशी हुज्जत घालणं सोडून हे सल्ले एन्जॉय करायला सुरुवात केली.
या दरम्यान मला खूप विचित्र प्रश्नही पडू लागले होते. म्हणजे मुलगी फक्त लग्नाच्या दिवशी ‘नवरी’ आणि दुस-या दिवशीपासून ‘बायको’ बनते पण मुलगा मात्र आयुष्यभर नवराच राहतो, असं का? आणि गम्मत म्हणजे यावरही मला ‘कळेलच.. कळेलच’ असंच उत्तर मिळत होतं.
असो, कुठलेही पूर्वग्रह मनात न ठेवता नवीन घरात जायचं असं माझं आधीच ठरलं होतं. मी संसार वैगरे याबद्दल बोलण्यासाठी अजून तशी नवीनच आहे पण माती मऊ असतानाच तिला योग्य आकार दिला तर उत्तम कलाकृती घडते. त्यामुळे नव्या घरातले सुरुवातीचे हे शिकण्याचे आणि समजून घेण्याचे दिवस, थोडक्यात माझ्या ‘ट्रेनिंग पिरीयड’ची मी सध्या तरी खूप मजा घेतेय.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण मुली जसं आपलं घर, कुटुंब सोडून नवीन घरी राहायला जात असतो तसंच ते घरही एका नवीन माणसाला घरात, कुटुंबात सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतं. आपल्या आणि त्या कुटुंबाच्या अनेक वर्षाच्या सवयी, दैनंदिन आयुष्य या सगळ्यावरच त्याचा परिणाम होत असतो. घरी एखादा पाहुणा आला तरी त्याच्यासाठी काही दिवस जागा करताना आपल्या नाकी नऊ येतात आणि इथे तर कायमसाठी एका व्यक्तीला आपल्या घरात आणि त्याहीपेक्षा आपल्या कुटुंबात सामावून घेणं हे तेवढं सोपं नक्कीच नाही. दोन्ही बाजूंनी थोडा प्रयत्न करणं हा त्यावरचा एकमेव उपाय आहे.
माझे सासू-सासरे आणि नवरा गेली अनेक वर्ष घरात तिघंच राहत होते पण आता मी आल्यानंतर त्यांनी मला असं काही आपलंसं करून घेतलं आहे की पाच दिवस माहेरपणाला गेल्यानंतरही माझं तिथे लक्ष लागत नव्हतं आणि त्यांनाही इथे माझ्याशिवाय करमत नव्हतं. शेवटी मी माहेरचा मुक्काम एक दिवस आधीच गुंडाळून परत माझ्या नवीन घरी आले. मला केवळ महिन्याभरातच हे घर माझं वाटू लागलंय याचं श्रेय खरं तर त्या घरातल्या माणसांचंच आहे. जसं माहेरी होतं अगदी तसंच मी या घरातल्या प्रत्येकाशी मोकळेपणाने बोलू शकते, अगदी सास-यांशीदेखील माझ्या बाबांसोबत बोलायचे तशा गप्पा मारू शकते. मला माझ्या घराची आठवण येऊ नये म्हणून माझा नवरा माझा मित्र झाला, सासू-सासरे आई-बाबा झाले आणि नणंदा मैत्रिणी झाल्या. माझ्या सवयी त्यांनी आत्मसात केल्या. आणि त्यामुळेच या घरात रुळायला मला एक आठवडाही लागला नाही.
अर्थात, या बाबतीत प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. पण माझ्या निरीक्षणाप्रमाणे अनेकदा ‘सासर’ याविषयीच्या चुकीच्या समजुतींमुळे आणि नव्या नवरीच्या पूर्वग्रहदूषित मनामुळेच अनेक वाद निर्माण होतात. ते थोडय़ाफार प्रमाणात असणारच पण अनेकदा ते टाळता येण्यासारखे असतात. सासर म्हणजे सासुरवास ही चुकीची समजूत आपल्या समाजातून हळूहळू नामशेष व्हायला हवी. लग्न ठरलेल्या मुलीला सासरची आणि तिथल्या माणसांची भीती दाखवण्यापेक्षा आपल्या चांगल्या अनुभवांतून तिचा आत्मविश्वास वाढवायला हवा. तरच ती साफ मानाने आणि सकारात्मक दृष्टिकोन सोबत घेऊन नव्या घरात प्रवेश करू शकते. लग्न दोन माणसांचं नाही तर दोन कुटुंबांचं असतं आणि असावं. दोन्ही पक्षातल्या लोकांनी एकमेकांच्या अडचणी समजून सगळं निभावून नेलं की सोहळाही छान होतो आणि मनंही दुखावली जात नाहीत. कारण लग्नात आहेराच्या साडय़ा किंवा रुखवताचं सामान महत्त्वाचं नसून एका नव्या नात्याची होणारी सुरुवात आणि त्यानिमित्तानं जोडली जाणारी दोन घरं आणि त्यातली माणसं सगळ्यात जास्त महत्त्वाची असतात.
तृप्ती एकबोटे-देवरुखकर

Wednesday, 29 January 2014

प्राणिपालक होताना...

प्राणिपालक होताना...
प्राण्यांची आवड असणं आणि त्यांचा सांभाळ करता येणं या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. योग्य माहितीअभावी आपण अनेकदा आपल्या पाळीव प्राण्यांचा जीव नकळत धोक्यात घालतो. प्राणिपालक होण्यासाठी अधिक जागरूकतेची आवश्यकता आहे.

काही दिवसांपूर्वी सोनालीला एक कुत्रा जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. तिने जवळ जाऊन त्याचा अंदाज घेतला असता गळ्यातल्या पट्टय़ावरून तो पाळीव कुत्रा असल्याचं तिला दिसलं. त्याच्या मालकाने त्याला सोडलं असावं किंवा तो भटकला असता त्याला एखाद्या वाहनाने धडक दिली असावी. त्याची अवस्था पाहता त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळणं आवश्यक होतं, पण अशा कोणत्याही संस्थेची माहिती त्यावेळी तिच्याजवळ उपलब्ध नव्हती. संपर्क शोधण्यासाठी तिने तीन-चार फोनही केले पण तोवर खूप उशीर झाला होता, तो कुत्रा गतप्राण झाला होता. दुस-या दिवशी सकाळी त्याच रस्त्याने जात असताना तिला त्याचं शव अद्याप तिथेच पडलेलं आणि त्यामुळे दरुगधी पसरल्याचं आढळलं. शेवटी तिनेच पालिकेला फोन लावला आणि त्यानंतर त्या मुक्या जनावराच्या शवाला तिथून उचलण्यात आलं. ही घटना पुढे अनेक दिवस तिच्या मनाला बोचत राहिली.
प्राण्यांचं हे असंच असतं. माणूस आणि पाळीव प्राणी किंवा पक्षी यांच्यातल्या सुंदर नात्याबद्दल अनेक कथा आपण पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. घरात पाळीव प्राणी किंवा पक्षी असणं अनेक ठिकाणी तर उच्च राहणीमानाचं प्रतीक मानलं जातं. आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना आपलं आडनाव लावण्याचाही नवा पायंडा प्राणिपालकांमध्ये पडला आहे. काही सर्वेक्षण आणि अभ्यासांमधून असं सिद्ध झालं आहे की, पाळीव प्राणी घरात असलेले लोक अधिक सुदृढ असतात कारण हे प्राणी त्यांना तणावमुक्त राहण्यासाठी फायदेशीर ठरतात. पण प्राण्यांची नुसती आवड असणं पुरेसं नाही तर त्यांची योग्य कोळजीही घेता यायला हवी. नाहीतर वर सांगितलेल्या गोष्टीसारख्या दुर्दैवी घटना घडतात.
काही वेळा प्राण्यांसोबत इतरांचा जीवही नकळत धोक्यात येतो. मागे एकदा परेलमध्ये राहणा-या एका मुलाने हौसेखातर घरात चक्क अजगराचं पिल्लू आणलं. छोटय़ाशा बरणीत ठेवलेलं ते पिल्लू सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय बनलं. आणि एक दिवस अचानक ते बरणीतून गायब झालं. प्रचंड शोधाशोध करूनही ते काही हाती लागलं नाही. तेव्हा सगळ्यांचं कुतूहल काळजीमध्ये बदललं. त्यानंतर जवळजवळ सहा-सात महिन्यांनी ते पिल्लू बिल्डिंगमधल्या अडगळीच्या सामानात असल्याचा सुगावा लागला आणि तिथल्या रहिवाशांनी सर्पमित्रांना पाचारण केलं. त्यांनी बरीच मेहनत करून त्याचा माग काढला आणि त्याला पकडण्यात यशस्वी झाले. जेव्हा त्याला पकडण्यात आलं तेव्हा ते पिल्लू राहिलं नसून चांगला सात-आठ फुटांचा अजगर झाला होता. तो जर वेळेत पकडला गेला नसता तर पुढे अनर्थ झाला असता. मुळात अजगर हा पाळीव प्राणीच नाहीए पण प्राणिप्रेमींच्या उत्साहाला अंत नसतो. परंतु त्यामुळे इतरांच्या जीवावरही बेतू शकतं.
शहराच्या ठिकाणी साधारणपणे कु त्रा, मांजर, ससे, सफेद उंदीर, पोपट, लव्हबर्ड्स आणि मासे वगैरे पाळले जातात तर ग्रामीण भागात गाय, म्हैस, बैल, शेळय़ा पाळण्याचं प्रमाण मोठं आहे. त्यांचा व्यावसायिक उपयोगही केला जातो पण तिथल्या लोकोंना त्यांच्या संगोपनाबद्दल पारंपरिक माहिती असते. इथे शहरात मात्र निव्वळ हौसेखातर, मित्रांनी आणला म्हणून किंवा रस्त्यात बिच्चारं पिल्लू पडलं होतं आणि दया आली म्हणून घरी आणलं असं करणा-यांचं प्रमाण अधिक आहे. पण आपण खरंच त्या प्राण्याची योग्य कोळजी घेऊ शकतो को, त्याच्या संगोपनासाठी आवश्यक असलेलं वातावरण निर्माण क रू शकतो को, याचा विचार फोर थोडी माणसं करतात. मग त्यांना सांभाळणं कठीण झालं की सोनालीला रस्त्यावर दिसलेल्या त्या कुत्र्यासारखी परिस्थिती उद्भवते. अगदी घरात फिशटँक बनवतानाही त्यात आपण कोणते मासे ठेवतोय, त्यांना योग्य अन्न दिलं जातंय का, त्यातल्या एखाद्या माशाचा इतर माशांना त्रास होणार नाही, टँक नेहमी स्वच्छ राहील.. अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते पण याबद्दल आपल्याकडे खूप उदासीनता दिसते. टँक स्वच्छ करण्याचा आळस केला जातो आणि माशांचे हाल होतात.
अनेकदा आपल्याकडे योग्य ती माहिती नसते. आपल्याकडे असलेल्या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची काळजी कशी घ्यायची, रस्त्यात एखादा प्राणी जखमी अवस्थेत सापडला तर काय करायचं किंवा आपल्या आसपास एखाद्या प्राण्यावर अत्याचार होताना दिसले तर कुणाला संपर्क साधायचा हे आपल्याला कळत नाही. एकाच ठिकाणी ही सगळी माहिती उपलब्ध व्हावी या हेतूने ‘पेट्स आर पीपल टू’ नावाचं संकेतस्थळ एका प्राणिपालकाने सुरू केलं आहे. इश्मित चंडोक या प्राणिप्रेमीची कथाही फार रंजक आहे. एका बांधकाम परिसरात इश्मितला कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू सापडलं. तो त्याला घरी घेऊन आला आणि खूप प्रेमाने त्याचं नाव ‘हार्ली चंडोक’ असं ठेवलं पण प्राणिपालनाबाबत त्याला कोहीच माहीत नव्हती. काही दिवसांनी हार्ली कुत्र्यांसाठीचं अन्न खाईनासा झाला. तेव्हा व्यवसायाने शेफ असलेल्या इश्मितने भरपूर अभ्यास करून त्याच्यासाठी पौष्टिक अशा पाककृती तयार केल्या आणि पुढे हाच त्याचा व्यवसायही झाला. ‘हार्लीज कॉर्नर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या कुत्र्यांसाठीच्या घरगुती अन्नाला आज मुंबईत बरीच मागणी आहे. आणि हे सारं के वळ त्याच्या आयुष्यात आलेल्या एका कुत्र्यामुळे शक्य झालं, असं तो नम्रपणे मान्यही करतो. याच प्राणिप्रेमीने इतर प्राणी मित्रांची मदत करण्यासाठी आणि पाळीव प्राण्यांच्या संगोपनाबाबत जाती निर्माण व्हावी यासाठी ‘पेट्स आर पीपल टू’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. इथे मुंबई, पुणे आणि बंगळूरुमधल्या प्राण्यांच्या डॉक्टर्सची, अॅम्ब्युलन्स सेवा, इस्पितळे आणि संस्थांची माहिती दिलेली आहे.
त्याचबरोबर पाळीव प्राण्यांच्या संगोपनाविषयीची तसंच त्यांच्याशी संबंधित कायदेशीर बाबींचीही माहिती उपलब्ध आहे. डॉ. मकरंद चौसाळकर हे प्राणितज्ज्ञही इथे मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असतात.
पाळीव प्राण्यांसंदर्भात अशा माहितींचे आणखी स्रोत निर्माण होण्याची आवश्यकता आहे. तरच आपल्याकडे प्राण्यांसंबंधी असलेल्या उदासीनतेला आळा बसेल तसंच सर्कस, प्राणिसंग्रहालय, सिनेमा अशा कोणत्याही ठिकाणी त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, याची आपल्याला जाणीव होईल.
तृप्ती एकबोटे-देवरुखकर

Thursday, 23 January 2014

संशोधनातून सक्षमतेच्या वाटेवर

संशोधनातून सक्षमतेच्या वाटेवर

स्त्रियांच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि सक्षमीकरणासाठी झटणा-या अनेक संस्था आहेत; पण समाजातील त्यांच्या स्थानाबाबत अभ्यास करून त्यांच्या सबळीकरणासाठी प्रयत्न करणारी ‘सोफाया सेंटर फॉर विमेन्स स्टडीज अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ ही सोफाया कॉलेजची संस्था आणि तिचं कार्य प्रेरणादायी आहे.
स्त्रियांचे प्रश्न आणि त्यांचं सक्षमीकरण याबद्दल आजकाल कुणीही बोलताना दिसतो. यासाठी काम करणा-या संस्थांचा तर सुळसुळाट झाला आहे. अशा खूप कमी संस्था अस्तित्वात आहेत, ज्या वेगळा विचार करून समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडवण्यासाठी पर्याय पुढे आणतात.
मुंबईतल्या सोफाया महाविद्यालयाने प्रस्थापित केलेली ‘सोफाया सेंटर फॉर विमेन्स स्टडीज अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ ही एक अशीच संस्था आहे, जी समाजात स्त्रियांना भेडसावणा-या समस्यांचा संपूर्ण अभ्यास करते आणि या माहितीच्या आधारावर महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करते. सोफाया महाविद्यालयाच्या आवारातच या संस्थेचं एक सुसज्ज ग्रंथसंग्रहालय आहे, ज्यात स्त्रियांशी निगडित अनेक विषयांवर विविध भाषांमध्ये देशातील आणि विदेशातीलही साहित्य उपलब्ध आहे.
त्याचप्रमाणे वृत्तपत्रांमधील स्त्रियांविषयी छापून आलेल्या लेख आणि बातम्यांचे सर्व तपशील छापील स्वरूपात उपलब्ध आहेत. शिवाय इंटरनेटची सुविधाही आहे. थोडक्यात, स्त्रियांविषयी अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी हे सुसज्ज ‘रिसर्च सेंटर’ तयार करण्यात आलं आहे. वर्षाअखेर या संशोधनाचा अहवाल छापला जातो, ज्याचा उपयोग अनेक प्रकारच्या अभ्यासांसाठी होतो. दरवर्षी संस्थेमार्फत ‘उर्ध्वमूल:’ हे स्त्रिया आणि त्यांच्याशी संबंधित विषयांवर पुस्तक प्रकाशित केलं जातं.
सुरुवातीला १९९०-९१ साली सोफाया कॉलेजच्या तत्कालीन प्राचार्यानी संस्थेची संकल्पना पुढे आणली. अखेर, ६ ऑक्टोबर २००१ रोजी या संस्थेची स्थापना झाली. या महाविद्यालयाच्या सध्याच्या प्राचार्या डॉ. (सिस्टर) आनंदा अमृतमहल या संस्थेच्या संचालकपदी अत्यंत उत्साहाने आणि जबाबदारीने सूत्र सांभाळत आहेत. त्यांच्या मते, ‘‘या संस्थेची स्थापना महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसंच त्यांच्या समस्या समजून घेऊन, त्यांच्यातील गुणांची ओळख करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी झालेली आहे. ही संस्था लहान असली तरी या कार्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे.’’
या संस्थेच्या कार्यक्रम अधिकारी असलेल्या लता पुजारी आणि पल्लवी बांदोडकर यांनी संस्थेच्या उद्दिष्टांबद्दल माहिती देताना सांगितलं की, आम्हाला अधिकाधिक ग्रामीण भागात पोहोचून तिथल्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काम करायचं आहे. त्यांच्यापर्यंत केवळ वस्तू पोहोचवण्यापेक्षाही त्यांच्यातला विश्वास जागृत करून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. केवळ स्त्रियांना मार्गदर्शन करून उपयोग नाही, तर परुषांनाही योग्यरीत्या जागृत करणं आवश्यक आहे. म्हणूनच संस्थेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये आणि प्रशिक्षणांमध्ये पुरुषांनाही सहभागी केलं जातं.
आकांक्षा, मुंबई मदर्स अ‍ॅण्ड चिल्ड्रन ऑर्गनायझेशन, यंगस्टर्स अशा विविध संस्थांसोबत सोफाया सेंटरने पुण्याजवळील राजगुरूनगर, कर्नाळा, वसई-विरार अशा अनेक भागांमध्ये काम केलं आहे. स्त्रियांची निर्णयक्षमता वाढावी आणि त्यांनी आत्मविश्वासानं स्वावलंबी व्हावं याकरिता ही संस्था अनेक छोटय़ा-मोठय़ा गृहव्यवसाय आणि लघुव्यवसायांचं प्रशिक्षणही पुरवते.
या अंतर्गत चॉकलेट-आईस्क्रीम बनवणं, बेकरी, मेणबत्त्या, कागदापासून शोभेच्या वस्तू बनवणं इथपासून थेट इंग्रजी भाषेचं शिक्षण, घरातील यंत्रांची दुरुस्ती करणं, खाद्यपदार्थ आणि पोषण, आत्मरक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य सहाय्यक, सामाजिक कार्य अशा अनेक विषयांचं शिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणानंतर अनेक महिलांनी स्वत:चे उद्योगही सुरू केले आहेत. संस्थेतर्फे अनेक स्तरांवर महिलांच्या विविध प्रश्नांवर वाद-विवाद आणि परिसंवादांचं आयोजनही केलं जातं.
सोफाया सेंटरद्वारे अनेक सव्‍‌र्हे आणि माहितीची पडताळणी करून स्त्री अर्भकाची वजन-उंची, स्त्रियांशी संबंधित पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना अशा विषयांवर मानवी हक्क आयोगाकडे प्रबंध सादर करण्यात येत आहे. महिला सक्षमीकरणासाठी अशाप्रकारची संस्था स्थापन करून सोफाया कॉलेजने एक नवा पायंडा पाडला आहे. या संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी महाविद्यालय स्वत: विशिष्ट रक्कम वर्षागणिक खर्च करते. पण बरेचदा निधीअभावी अनेक कामं लांबणीवर पडतात. शासनाकडून या संस्थेला आणि त्यांच्या संशोधन कार्याला कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. सुरुवातीच्या काळात टाटा, एस्सार अशा काही कंपन्यांकडून निधी उपलब्ध होत असे, पण आता मात्र संशोधनाच्या कामासाठी खर्च करण्यास कंपन्या निरुत्साही दिसत आहेत.
स्त्रियांना समाजात असमानतेची वागणूक मिळण्यामागची, ती दुर्लक्षित राहण्यामागची मूळ कारणं शोधून त्यावर उपाय करण्याचा ‘सोफाया सेंटर फॉर विमेन्स स्टडीज अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’चा निर्धार आहे. आम्ही समस्या सोडवू असा आमचा दावा नाही, पण त्या समस्येचा खोलवर संपूर्ण अभ्यास करून ती सोडवण्यासाठीचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असं संस्थेचे अधिकारी ठामपणे सांगतात. महिला सक्षमीकरणाबद्दल वरवरची चर्चा आणि कृती करणा-या आपल्या समाजात प्रामाणिकपणे या समस्यांचा अभ्यास करून तोडगा काढणा-या अशा संस्थांची गरज आहे.
संपर्क : sophia_womencentre@rediffmail.com

नोकरी करणारीच मुलगी हवी!


स्त्रीच्या व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल कुणीही भरभरून बोलताना दिसतं पण आपल्याकडच्या ‘सोयीनुसार’ उदयास आलेल्या स्त्री स्वातंत्र्याच्या संकल्पना आता पुन्हा एकदा अभ्यासण्याची गरज आहे. नोकरी करणारी मुलगी ही काळाची गरज आहे, पण तिच्या नोकरीशी जोडलेल्या इतर अनेक गोष्टींचा विचार करण्याची आपण तसदीही घेत नाही.

आजकाल कुठल्याही विवाहोत्सुक तरुणाला किंवा त्याच्या आई-वडिलांना तुम्हाला लग्नासाठी कशी मुलगी हवी असा प्रश्न विचारला की, ‘कशीही असो पण नोकरी करणारी हवी’, असं उत्तर हमखास मिळतं. कोही जणांची तर निव्वळ तेवढीच अट असते. (आपण रूढ आणि सौम्य भाषेत याला ‘अपेक्षा’ असं म्हणतो) अनेक दा तर रंग, रूप, गुण, वर्तणूक, संस्कार अशा अनेक गोष्टींना फोटा दिला जातो आणि केवळ नोकरी या एकाच ‘गुणाला’ प्राधान्य दिलं जातं. चांगली नोकरी असणा-या मुलींना लग्नाच्या ‘बाजारात’ जास्त मागणी असते. आमची सून फलाना फलाना कंपनीत एवढया मोठया पगाराच्या नोकरीवर आहे, हे सांगताना आजकाल सासरकडच्या मंडळींचा ऊर अभिमानाने (की गर्वाने) भरून येत असतो. एकवेळ अशी होती जेव्हा लग्नानंतर नोकरी करण्याची परवानगी मिळावी, मुभा मिळावी म्हणून मुलींना खूप प्रयत्न करावे लागत. पण आपल्या समाजाने लग्नानंतर मुलीने नोकरी करण्याची ‘मुभा’ ते ‘अट’ हा प्रवास कधी साध्य केला ते कळलंच नाही.
मुलीने आत्मनिर्भर असावं, आर्थिकदृष्टया स्वतंत्र असावं, हे शंभर टक्के वादातीत आहे पण म्हणून तिने कुठल्याही परिस्थितीत नोकरी करत राहण्याचं बंधन जाचकच आहे. कोरण घरातल्या कमावत्या पुरुषाकडून त्याने गृहव्यवस्थापनही करावं अशी कुणाचीही अपेक्षा नसते पण बाईकडून मात्र तिने नोकरी करावी, वेळेत घरी यावं, जेवणही करावं, मुलांनाही सांभाळावं, नव-याकडे- सासूसास-यांकडेही बघावं, पाहुणेमंडळींपासून सा-यांची उठबसही करावी, सण-वारही करावेत, घरकामही करावं.. अशा सगळ्याच अपेक्षा अगदी सहजपणे केल्या जातात. पण नव-याप्रमाणेच ती सुद्धा आठ-नऊ तास नोकरी क रून, बस-ट्रेनचे धक्के खात, अनेक व्याधी अंगावर कोढत, उन्हा-पावसात राबतच असते. ती ही माणूसच आहे, ती ही दमते. पण घरची परिस्थिती उत्तम असतानाही तिने नोकरी करतंच राहायला हवी, कोरण अनेकदा तिची नोकरी हा घरच्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकार मध्यम वर्गीय आणि उच्चमध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये सर्वाधिक आढळतो. कोरण आजच्या वाढत्या महागाईत गरीब घरांमध्ये शक्य असेल तितक्यांनी नोकरी करणं अनिवार्यच झालेलं आहे. खरं तर मध्यम वर्गातही ही बाब लागू होते पण त्यांच्याकडे अनेकदा पर्याय उपलब्ध असतात.
परवा नवव्या महिन्याच्या गर्भवतीला ट्रेनमधून प्रवास करून नोकरीसाठी जाताना पाहिलं आणि न राहवून विचारलं तेव्हा, ‘पर्याय नाहीए गं! ऑफिसमधून पगारी रजा मिळत नव्हती आणि पहिल्या बाळंतपणाचा सगळा खर्च माहेरच्यांनी करायचा आहे, त्यांना थोडा हातभार लागावा म्हणून जमेल तितके दिवस नोकरी करतेय.’, असं ती म्हणाली. बाळ आपल्याला हवं पण त्याच्या जन्मासाठी खर्च उचलणं म्हणजे ‘आपल्यात अशीच पद्धत आहे’ हे बिरूद ऐकवलं जातं. याचाच अर्थ आपल्या ‘सफेद कॉलर’ समाजात आजही इतक्या भंपक आणि तर्कहीन गोष्टींचा प्रथेच्या नावाखाली आपण बिनदिक्कत अवलंब करतच असतो. असो, हा संप्रू्ण स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.
आपल्या मूळ मुद्दयाकडे परतताना माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीसोबत नुकताच घडलेला एक किस्सा आठवतो. तिचं लग्न झालं, तेव्हा तिला मोठया कंपनीत उत्तम पगाराची नोक री होती. दुर्दैवाने लग्नानंतर तीनच महिन्यांनी तिला ही नोकरी सोडावी लागली. दुसरी नोकरी शोधून ती मिळेपर्यंत चार-सहा महिन्यांचा कोलावधी गेला. पण ह्या कालावधीत लग्नाच्या वेळी तिला डोक्यावर घेणा-या सासरच्या मंडळींची वागणूक सरडयाच्या रंगाप्रमाणे बदलली. ‘आम्हाला कोयमस्वरूपी नोकरी असणारी दुसरी मुलगी मिळत होती, उगीच घाई केली, तुला नोकरी मिळाली की मी तुझ्याशी पूर्वीसारखी चांगली वागेन’, असे कडवट बोल आडून-आडून ऐकवायला सुरुवात झाली. त्या नवविवाहित तरुणीच्या मनावर ह्याचा काय परिणाम झाला असेल, ह्याचा विचारही करवत नाही. पण हे जर आपल्या पुरोगामी म्हणवणा-या समाजातील प्रातिनिधिक चित्र असेल तर समस्या गंभीर आहे.
मुळात नोकरीची अट असण्यामागची कोरणं कोय, असं लग्नाच्या ‘बाजारात’ उभ्या असलेल्या कोही मुलांना विचारलं असता, कोहींनी साळसूदपणाचा आव आणत, ‘ती तिच्या पायावर उभी राहायला हवी, तिचं व्यक्तिस्वातंत्र्य..’ वगैरे गोष्टींचा ऊहापोह केला तर कोहींनी थोडं मोकळं होत ‘माझ्या कमाईला हात-भार लागावा म्हणून..’, अशी प्रांजळ कबुली दिली.
कोहींनी तर ‘घरी बसून नुसत्या मालिका पाहणं आणि चहाडया करणं.. यापेक्षा घराबाहेर गुंतलेली असणं बरं म्हणून नोकरी करावी’ असं सांगितलं. पण तिच्या ह्या ‘गुंतवणुकी’तून आलेला पैसा गुंतवण्याचे किंवा खर्च करण्याचे अधिकारही अनेकदा तिच्याकडे नसतात. तिच्या आत्मनिर्भरतेच्या नावावर अनेकदा तिच्या कमाईवरच डोळा असल्याचं दिसून येतं. म्हणून तर पगार झाला की तो सुनेने सासूच्या किंवा नव-याच्या हातात आणून ठेवावा असा आजही अनेकांचा आग्रह असतो ज्याला आपण ‘आधुनिक संस्कारां’च्या यादीत सुलभतेने नेऊन ठेवतो.

आपली बदलती जीवनशैली आणि वाढती महागाई पाहता घरात अधिक कमाईची गरज प्रत्येकाला जाणवते आहे. नवरा-बायको दोघंही कमावते असले तरी निभावणं कठीण होत चाललंय, अशा वेळी आपल्या जुन्या समजुती बाजूला ठेवून आपण आपल्याकडच्या स्त्रियांना शिकवलं, नोकरी करण्याची परवानगी दिली पण तिला तिचे छंद जोपासण्याची, सहका-यांसोबत पार्टी किंवा सहलीला जाण्याची मुभा दिली को? तिला वाटेल तेव्हा माहेरी किंवा बाहेर जाण्याची सूट आपण तिला दिली को? तिच्या नोकरी आणि क रिअर संबंधीचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिला खरंच आहे को? म्हणजे स्वातंत्र्य दिल्याचं दाखवायचं पण नाडया मात्र आपल्याच हातात राहतील, याची सोयीने कोळजीही घ्यायची, असा दुटप्पी व्यवहार होताना दिसतो. एका दिवसासाठी को होईना तिला स्वयंपाकघरातून रजा देणारे असे कितीसे नवरे आपल्याला आजूबाजूला दिसतात. समाजातल्या स्त्री-स्वातंत्र्याच्या संकल्पना पुन्हा एकदा पडताळून पाहण्याची आपल्या समाजाला अत्यंत आवश्यकता आहे. पण दुर्दैवाने जिथे तिला एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी आपला समाज असमर्थ ठरला आहे, तिथे तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा एवढा विचार कोण आणि कशासाठी करेल?
तृप्ती एकबोटे-देवरुखकर